स्वामी नामाचा हा महिमा, या हो भक्तांनो दरबारी ।
मला बाई जायाचं गुरुवारी गं, अक्कलकोटला माहेरी ॥
स्वामी अक्कलकोटी येईन, चंदन अष्टगंध आणीन ।
स्वामीरायाला लावीन गं, परत माघारी येईन ॥१॥
स्वामी अक्कलकोटी येईन, हीना अत्तर आणीन ।
स्वामीरायाला लावीन गं, परत माघारी येईन ॥२॥
स्वामी अक्कलकोटी येईन, लाडू-पुरणपोळी आणीन ।
स्वामीरायाला भरविन गं, परत माघारी येईन ॥३॥
स्वामी अक्कलकोटी येईन, स्वामी दर्शन घेईन !
स्वामी चरणी शरण द्या हो, हेच मागणे मागीन ॥४॥
- प्रथमेश लोके