!! श्री स्वामी समर्थ !!
श्री स्वामी समर्थांच्या कृपेने आणि गुरूंच्या आशीर्वादाने आज दि. २६/०६/२०११ रोजी श्री स्वामी समर्थ भक्त परिवाराच्या फेसबुकवरील सभासदांची पहिली सभा यशस्वीरीत्या झाली.
फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून साधारण १५ लोकांनी हजेरी लावली. त्याचबरोबरीने या भक्त परिवाराचे विश्वस्त देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. या सभेस कार्यक्रमाला येणा-यांची नावे पुढील प्रमाणे आहेत.
१) शैलेश परब
२) अभिजित गुरव
३) महेश चिनकटे
४) केतन पत्की
५) दीप्ती घनकुतकर
६) वैशाली नाईक
७) मंगला सुर्वे
८) प्रवीण बाणे
९) अक्षया मालवणकर
१०) गुरुनाथ माडवी
११) प्रभंजन देसाई
१२) स्वरा देशमुख
१३) चंद्रशेखर पिलाने
प्रथमेश लोके
१४) प्रशांत पाणींद्रे
वरील सर्व मंडळी फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून आली होती.
त्याच प्रमाणे कार्यक्रमाला पुढील विश्वस्त आणि हितचिंतकांनी देखील हजेरी लावली होती. ते पुढीलप्रमाणे
१) शंकर लोके (अध्यक्ष)
२) मयूर देवळेकर (सचिव)
३) विनोद विचारे(विश्वस्त)
४) संजीव नाईक (विश्वस्त)
५) डॉ. विशाल पाटील
६) राजेश पाटील
वरील सर्वांचे या सभेला येण्याकरता मनपूर्वक आभार. आणि जे काही कारणास्तव नाही येऊ शकले त्यांच्याही शुभकामना आमच्या सोबत होत्या, त्यासाठी त्यांचेहि आभार.
कार्यक्रमाची सुरवात श्री शैलेश परब यांनी नामस्मरण म्हणजे काय? आणि त्याचे महत्त्व विषद केले. त्यांचे अनुभव हे खरोखर ऐकण्यासारखे होते. त्यानंतर प्रथमेश लोके यांनी सामुदायिक नामस्मरण चालू करावे असा प्रस्ताव मांडला आणि सर्वांचेच यावर एकमत झाले. त्यानंतर परिवाराचे विश्वस्त श्री. विनोद विचारे यांनी नामस्मरण आणि समाजसेवा यांची सांगड कशाप्रकारे करता येईल याचे विस्तृत वर्णन केले. श्री मयूर देवळेकर (सचिव) यांनीही स्वामी समर्थ भक्त परिवार करत असलेल्या कार्याची आणि भविष्यामधल्या स्वामी समर्थ भक्त परिवाराचे संकल्प सांगितले. त्यानंतर डॉ. विशाल पाटील यांनी "आरोग्यं धनसंपदा" या उक्तीला अनुसरून श्री स्वामी समर्थ भक्त परिवाराच्या माध्यमातून लोकांच्या आरोग्यासाठी कशाप्रकारे काम करता येईल याची कल्पना दिली. श्री शंकर लोके (अध्यक्ष) यांनीही त्यांचे श्री स्वामी समर्थांबद्दलचे विचार आणि अनुभव मांडले. त्यानंतर फेसबुकवरील सर्व मंडळींनी आप-आपली ओळख करून दिली, तसेच प्रत्येकानं स्वामींचे आलेले अनुभव थोडक्यात मांडले. काहींना आपले अनुभव सांगताना भावना अनावर झाल्या. "श्री शंकर महाराज प्रतिष्टान - मुंबई" यांचे विश्वस्त प्रभंजन देसाई हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांच्या संस्थेमार्फत देखील दर महिन्याच्या १३ तारखेला सामुहिक प्रार्थना होते. आणि या १३ ऑगस्ट २०११ ला त्यांचा ५० वा सामुदायिक प्रार्थना आणि सत्संगाचा कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाचे आमंत्रण त्यांनी सर्वांना दिले.
दरम्यान फेसबुकवर आपल्याला "मी सावळा" म्हणून प्रसिद्ध असलेले श्री.सावळा राम पाटील यांचाही फोन आला. त्यांनीही आपल्या नामस्मरणासाठी शुभेच्छा दिल्या. व "श्री स्वामी समर्थांचे फेसबुकवर अनेक ग्रुप असू नयेत एकच ग्रुप असावा अशी महत्त्वपूर्ण सूचना केली. त्यांच्या शुभेच्छांसाठी त्यांचेही खूप खूप धन्यवाद.
त्यानंतर श्री मयूर देवळेकर यांनी ६ ऑगस्ट २०११ पासून मासिक नामस्मरणाची सुरुवात होईल तसेच सर्वांची तयारी असल्यास दि. १५ ऑगस्ट २०११ रोजी नेरळ येथील अवसरे गावातील स्वामींच्या मठात देखील नामस्मरण होईल असे जाहीर केले.
यानंतर औपचारिकरित्या सभेची सांगता झाली पण नंतर सुद्धा बऱ्याच वेळ स्वामी भक्तांच्या गप्पा रंगल्या होत्या.
पुन्हा एकदा या सभेला आलेल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि जे या कार्यक्रमासाठी काही कारणास्तव येऊ शकले नाहीत त्यांचेही त्यांच्या सदिच्छासाठी आभार.
आपल्या सहकार्याने पुढील नामस्मरणाचा कार्यक्रम देखील पार पडेल यात शंका नाही. तेव्हा असेच सहकार्य करत राहा...
श्री श्री श्री स्वामी समर्थ..

No comments:
Post a Comment