Showing posts with label आनंदनाथ महाराज. Show all posts
Showing posts with label आनंदनाथ महाराज. Show all posts

Monday, March 10, 2014

आनंदनाथ महाराज रचित अभंग

स्वामी नाम तुम्ही नित्य घेता वाचे ।
सुख जिवा साचे होय खरे ॥१

तया विण आम्हा नेणे हो सर्वथा ।
आणिक ती वार्ता जगांतरा ॥२

पुरवील अर्थ स्वामी कृपावंत ।
इच्छित मनोरथ दयाळ तो ॥३

आनंद म्हणे माझा पाठीराखा खरा ।
तारक हा बरा स्वामीराज ॥४


रचयिता : सदगुरु श्री आनंदनाथ महाराज