Sunday, April 22, 2018

** अशी घेतली शंकर महाराजांनी समाधी **


आज वैशाख शु. ८ (दुर्गाष्टमी) (सोम. दि. २३ एप्रिल २०१८) ! श्री शंकर महाराजांचा ७१ वा समाधी दिन !  या दिनानिमित्त सर्व भक्तांसाठी हा विशेष लेख प्रस्तुत करत आहोत.
अवश्य वाचा व जास्तीत जास्त शेअर करा.
पुण्यातील स्वारगेटकडून कात्रजकडे जाणाऱ्या रस्त्यावर, स्वारगेटपासून साधारण तीन-साडे तीन किमी अंतरावर डाव्या हाताला एक मठ लागतो. हाच सदगुरू श्री शंकर महाराजांचा समाधी मठ ! 
** *अशी घेतली शंकर महाराजांनी समाधी* **
श्री शंकर महाराजांनी बापू नावाच्या भक्ताला पर्वतीवर गुरुचरित्राचे उलटे पारायण अष्टमीपासून सुरु करायला सांगितले. सप्तमीला एक कप चहा घेतला. एका खोलीत छोटी गादी घातली. एक तक्या ठेवला। आंघोळ करून त्या खोलीत जाताना सांगितले दार लावून घ्या. मी कोणाला भेटणार नाही. मला बोलायचे नाही. कोणी आले तरी दार उघडू नका. सकाळी ठीक १० वाजता महाराज खोलीत गेले. ढेकणे मामींनी दार लावून घेतले. दाराजवळ दोघे पहारा देत होते. रात्रभर ढेकणे मामा मामी घोंगडीवर बसून होते. पहाटे आतून आवाज आला. माझी आत्मज्योत आता अनंतात विलीन होत आहे. पुढील सोय करा. महाराजांनी सांगितल्या प्रमाणे अष्टमीला आपला देह सोडला. संपूर्ण पुण्यात बातमी पसरली भक्तांचे लोंढे धावत आले. भक्तांना रडू आवरत नव्हते. न्यायरत्न विनोद तांब्याची तार घेवून आले. त्यांनी त्या तारेचे एक टोक महाराजांच्या छातीला आणि दुसरे टोक कानाला लावले. त्यातून आवाज आला. "आत्मकलेपैकी एक कला जगकल्याणासाठी समाधी स्थानांत सदैव राहील !" आणि श्री ज्ञानेश्वर माऊलींचे वचन आशीर्वाद म्हणून ऐकू आले, "जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥"  ज्ञाननाथ रानडे यांना महाराजांचा संदेश आला. आळंदी, जंगली महाराज, माळी महाराज, सोपानकाका, ओंकारेश्वर व पद्मावती या तीर्थक्षेत्रांचे निर्माल्य माझ्या समाधी स्थानात आणून टाकावे. ज्ञाननाथ रानडे यांनी गाडी घेवून अडीज तासात निर्माल्य आणले. मामा ढेकणे व मामी यांना दु:खाचा वेग आवरेना. त्यांच्या घरापासून काका हलवाई, दत्त मंदिर, ग्लोब सिनेमा, श्री अक्कलकोट स्वामी मठ, मंडई, शनिपार पर्वती, अरणेश्वर, पद्मावती आणि शेवटी मालपाणीच्या शेतात धनकवडीला महाराजांची अंतयात्रा आली. भस्मे काका, दादा फुलारी, डॉक्टर शुक्ला, डॉक्टर धनेश्वर या चौघांनी महाराजांचा देह खांद्यावर घेवून समाधीच्या जागेपर्यंत आणला. त्या वेळी दादा फुलारींना श्री शंकर महाराजांनी आपल्या हाताच्या कोपराने धक्का दिला व म्हटले, "अरे मला निट धर." फुलारी दादांनी दचकून महाराजांकडे पहिले. समाधीत ठेवताना मारुती माळी महाराजांनी त्यांचे अखेरचे दर्शन घेतले. त्यांना ते हनुमंताच्या अर्थात मारुतीरायाच्या रुपात दिसले. त्यावेळी माळी महाराज म्हणाले, "भक्तीच्या वाटा जगाला दाखवण्यासाठीच आपण हे रूप घेतले काय?" सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास महाराजांच्या पार्थिव देहाला समाधी गुफेत ठेवले. "ॐ अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज सदगुरू श्री शंकर महाराज की जय" अशाघोषात टाळ मृदुंगाच्या गजरात आसमंत निनादून गेला.  (वरील हे वर्णन ज्ञाननाथजीच्या पुस्तकातील आहे.)
समाधीत ठेवल्यावर बाबुराव रुद्र त्या समाधीच्या रात्री त्या घनदाट अंधारात भयाण जंगलात न घाबरता समाधी सोबत राहिले. सारी भक्त मंडळी घरी निघून गेली. महाराजांच्या तीन पादुकांपैकी एक समाधी मंदिरात, एक सोलापूरच्या जक्कलांच्या मळ्यातील दत्त मंदिरात व एक सोलापूरच्या शुभराय मठात ठेवली. प्रथम समाधी बांधली गेली. नंतर एक पत्र्याची शेड. असे करता करता असे आजचे भव्य दिव्य समाधी मंदिर उभे राहिले.
आजही मनोभावे हाक मारली असता समाधी घेतलेले सद्गुरू श्री शंकर महाराज समोर उभे राहतात हे खास वैशिष्ट्य आहे. आपली लीला आजही कश्या प्रकारे दाखवतील याचा काही नेम नाही. अनेकांना याचा अनुभव आला आहे. आणि तसे त्यांनी आपल्या पुस्तकात लिहून ठेवले आहे.
श्री शंकर महाराजांचे समाधी नंतरचे अस्तित्व -
शंकर महाराज समाधी घेतल्या नंतर सुद्धा भक्तांना भेटू लागले. स्वप्नात जाऊन मार्गदर्शन करू लागले. एका भक्ताला कुंपणाजवळ दर्शन दिले. व एका भक्ताला समाधी मठात विराट रुपात दर्शन दिले. १९४५ साली दिगंबर सरस्वती राजयोगी अन्ना महाराजांच्या दर्शनास गेले असता मी २१ वर्षांनी तुझ्याकडे दर्शनास येईन असे सांगितले होते. १९६६ साली वाघोड ला उत्सवात श्री शंकर महाराज भेटले त्यांना घेवून रावेर येथे आले. तेथे सर्वांनी पाद्यपूजा केली. नैवेद्य दिला. वाजंत्री आणली. अन्ना महाराज व वाघोडकरांचा अष्टभाव जागा झाला. नंतर त्याच्या घरी मुंबईला महाराजांना आणले. त्याच्या उपस्थितीत श्री अनंत काळकर व जयश्री इखे यांचा साखरपुडा झाला त्यावेळी शंकर महाराजांनी त्याच्या सासऱ्याला टोपी व रुमाल भेट दिला आणि ते निघून गेले. त्या दिवसापासून घरची परिस्थिती चांगली झाली. आज मुलुंड येथे टोपी व रुमाल श्री रमेश इखे यांच्या घरी जपून ठेवला आहे. सौ. उमाताई व श्री शंकरराव नेरुरकर (दादर, मुंबई येथील प्रसिद्ध आयडियल बुक डेपो कंपनीचे मालक) हे दोघे १९८९ साली श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या दिवशी (चैत्र शु. द्वितीया) रात्री २ वाजता बोरीवली येथे L.I.C. कॉलोनी येथून घरी येत असता, दाट अंधारात गर्द झाडीतून अचानक श्री शंकर महाराज बाहेर आले. सिगारेट व माचीस घेवून झाडीत अदृश्य झाले. असा हा अनपेक्षित प्रसंग पाहून दोघे स्तब्ध होवून पहात राहिले. धनकवडीच्या समाधीचा परिसर पूर्वी जंगलाचा होता. वाघ नेहमी येत. पण कोणाला कसलीही इजा झाली नाही. महाराजांचे भक्त दत्तात्रेय गणेश अभ्यंकर यांना रात्री समाधीतून बाहेर येउन दर्शन दिले. महाराज समाधीतून बाहेर आले व आपला पाय हंडीपर्यंत नेउन हंडी हलवली. हे अभ्यंकरानी समाधी नंतर ३ वर्षाने अष्टमीच्या रात्री पाहिले. अभ्यंकरांची मुलगी आजारी असताना महाराज घरी आले व अभ्यंकराना भेटले. टोपी चपला सोडून संडासात गेले. लगेच त्यांनी चप्पल टोपी पेटीत लपवून ठेवल्या बराच वेळाने संडासात पहिले तर महाराज तिथे नव्हते. व पेटीतील लपवून ठेवलेली चप्पल टोपी नाहीशी झाली. पुण्याच्या लाकडी पुलावर एका माणसाला श्री शंकर महाराज नावाने एक माणूस भेटायचा. दोघांची छान मैत्री जमली. दोघे गप्पा मारत बसायचे.  नाव-गाव विचारल्यावर तो गृहस्थ "मी शंकर महाराज ! धनकवडीला राहतो" म्हणून त्या व्यक्तीने सांगितले. दोन दिवस श्री शंकर महाराज आले नाहीत म्हणून तो शोधत धनकवडीला समाधी मठात आला. बाबुराव रुद्रांनी महाराजांची समाधी दाखवली. ऐकुन गृहस्थ थक्क होतो. तो रुद्रांना सांगतो, की महाराज रोज लाकडी पुलावर येतात. ते आज आणि काल आले नाहीत म्हणुन चौकशी करायला आलो. रूद्र त्यांना सांगतात की महाराजांनी आठ वर्षांपूर्वीच समाधी घेतली आहे. हि महाराजांची लीला ऐकून तो गृहस्थ व रुद्र दोघेही थक्क झाले. तो गृहस्थ समाधी समोर पाया पडून निघून गेला.
सोलापूर दक्षिण कसबा पेठेत राहणारे श्री दादा फुलारी सौर्गावकर यांना महाराजांनी समाधी नंतर त्याच्या घरी जावून चहा व सिगारेट अंगावरचा सदरा व पायजमा मागितला. तो दिल्यावर चल माझ्या बरोबर असे सांगितले. सौर्गावकर गेले नाहीत. पण त्या नंतर ८ दिवसांनी सौर्गावकरांनी देह ठेवला.
"श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ" हा  माझ्या गुरूचा जप
आहे असे श्री शंकर महाराज म्हणत. "माझा गुरु व मी वेगळा नाही. जो माझ्या गुरुचा जप करेल त्याचे सर्वच मनोरथ पूर्णच करावयाची जबाबदारी माझी राहील. माझे स्मरण करा. व माझा अनुभव घ्या." ही महाराजांची वचने आहेत. श्री शंकर महाराजांची ही वचने आजही खरी ठरतात.
(आंतरजालावरून संकलीत)
संकलन व संपादन : प्रथमेश लोके (7021942657)
श्री स्वामी समर्थ भक्त परिवार, फेसबुक समूह
(कृपया हा लेख दिलेल्या लिंकसकट व संपूर्ण आवाहनासहित शेअर करावी जेणेकरून पुढील लेख देखील सर्वांना मिळू शकतील.)
श्री शंकर महाराजांची प्रचिती वेळोवेळी लोकांना येत आहे आणि म्हणूनच की काय श्री शंकर महाराजांचा भक्त परिवार जा दिवसागणिक वाढतच चालला आहे. म्हणूनच श्री शंकर महाराज महाराज यांच्या समाधी दिनाच्या या अत्यंत पावन दिनी श्री शंकर महाराजांच्या कार्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी "श्री शंकर महाराज परिवार" या फेसबुक पेजची निर्मिती आम्ही "श्री स्वामी समर्थ भक्त परिवार" फेसबुक समूहच्या माध्यमातून करत आहोत. (Page : fb.me/shreeshankarmaharaj ) या फेसबुक पेजवर राजाधिराज श्री स्वामी समर्थ महाराज, सद्गुरू श्री शंकर महाराज विशेष माहितीपर लेख केले जाईल. जिज्ञासू स्वामीभक्तांनी जरूर त्याचा लाभ घ्यावा. पेजची लिंक पुढील प्रमाणे आहे : fb.me/shreeshankarmaharaj
श्री स्वामी समर्थ महाराज व श्री शंकर महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व आपल्या सर्वांच्या सहकार्याने निश्चितच या उपक्रमास सुयश लाभेल याची खात्री आहे. पुन्हा एकदा आजच्या या पावन दिनी, सद्गुरु श्रीस्वामींचे महान शिष्य श्री शंकर महाराज यांच्या सुकोमल श्रीचरणीं अनंत दंडवत प्रणाम !
संकलन : प्रथमेश लोके
श्री स्वामी समर्थ भक्त परिवार, समूह
(WhatsApp : 7021942657)
(FB https://www.fb.com/shreeswamisamarth)
(Shankar Maharaj Page : fb.me/shreeshankarmaharaj)
राजाधिराज श्रीस्वामी समर्थ महाराजांशी तसेच श्री सद्गुरू शंकर महाराजांशी संबंधित आणखीन दुर्मिळ व अस्सल (Exclusive & Authentic) माहितीसाठी व इतर अध्यात्मिक माहितीपर मेसेजेस वाचण्यासाठी आपल्या श्रीस्वामी समर्थ  भक्त परिवाराचे खालील फेसबुक पेज अवश्य लाईक करावे, व्हॉटसअॅप लिस्टला जॉईन व्हावे किंवा ब्लॉगला फॉलो करावे.
WhatsApp : 7021942657
Facebook Page: https://www.facebook.com/shreeswamisamarth
Blog : https://www.swamisamarthparivar.blogspot.com
तसंच अधिकाधिक लोकांना व जास्तीत जास्त ग्रुप्समध्ये हा मेसेज फेसबुक, व्हॉटसऍप इ. माध्यमाद्वारे या दोन्ही लिंकसकट व संपूर्ण आवाहनासहित शेअर करावी ही नम्र विनंती.
॥ ॐअनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय ॥
॥ राजाधिराज योगीराज श्री सद्गुरू शंकर महाराज की जय ॥
आपले नम्र
श्री स्वामी समर्थ भक्त परिवार, फेसबुक समूह
https://www.facebook.com/groups/shreeswamisamarth

No comments:

Post a Comment