Wednesday, March 25, 2020

** श्री स्वामी समर्थ जयंती विशेष लेख **

** स्वामी माझा अवतरला । दीन भक्तांच्या काजाला ॥ **
** श्री स्वामी समर्थ जयंती विशेष लेख **
(आवर्जून वाचा व जास्तीत जास्त शेअर करा)

आज गुरुवार, चैत्र शुद्ध द्वितीया (दि. २६ मार्च २०२०)! अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांची जयंती अर्थातच श्रीस्वामी महाराज प्रगटदिन. 


या पावनदिनी श्रीस्वामी महाराजांना आमचे कोटी कोटी प्रणाम आणि आपणा सर्वांना श्रीस्वामी समर्थ जयंती उत्सवाच्या शुभेच्छा.



श्री स्वामी समर्थ हे प्रत्यक्ष परब्रह्म आहेत. त्यांनीच या विश्वाची निर्मिती केली आहे. खरोखरच अनंत कोटी ब्रह्मांडाचे ते खरेखुरे नायक आहे. त्यांच्या हाती असलेली गोटी हि ब्रह्मांडावर असलेल्या त्यांच्या निर्विवाद सत्तेचीच आठवण करून देते. आज म्हणजे चैत्र शुद्ध द्वितीया हा स्वामींचा जयंती उत्सव अर्थातच प्रगटदिन. पण श्रीस्वामी कसे प्रगट झाले, कुठल्या वर्षी प्रगट झाले याबद्दल मात्र स्वामी चरित्रकारांमध्ये एकवाक्यता नाही परंतु हे सर्वच जण चैत्र शुद्ध द्वितीया हीच स्वामी महाराजांची जयंती आहे असे मानतात. त्यामुळे "चैत्र शुद्ध द्वितीया" या तिथीबाबत कुठलेही दुमत नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी. 


प्रत्यक्ष श्रीस्वामी महाराज ज्यांना आपला पुत्र मानीत असे हरिभाऊ तावडे उर्फ श्री स्वामीसुत महाराज सांगतात की  शालिवाहन शके १०७१ चैत्र शु. द्वितीया (इ.स.११४९) या शुभ दिवशी स्वामी महाराज अष्टवर्षीय (आठ वर्षाच्या) बालक स्वरूपात उत्तर भारतात हस्तिनापूरजवळील छेले या खेडेगांवी धरणी दुभंगून प्रकट झाले. श्रीस्वामीसुतांनी रचलेल्या श्रीस्वामी अवतारकांड या पोथीत हा प्रसंग सविस्तर वर्णिलेला आहे. श्रीस्वामी समर्थ महाराजांनीच श्रीस्वामीसुत महाराजांना हा दृष्टांताने सारे स्मरण केले.  मध्यहिंदुस्थानात हस्तिनापूरनजीक छेलिखेडेग्रामी विजयसिंग नावाचा एक आठ वर्षाचा बालक राहत असे. भक्त प्रल्हादाप्रमाणे हा देखील भगवंताचा भोळा भक्तच होता असं म्हटलं तर वावगं ठरू नये. तर या अशा या छेलिखेडेग्रामी चैत्र शुद्ध द्वितीयेला शके १०७१ ला सकाळी एका वटवृक्षाजवळ हा बालक गोटी खेळ खेळण्यासी गेला. हा प्रसंग श्रीस्वामीसुत रचित अवतारकांडात पुढीलप्रमाणे वर्णिलेला आहे.-

 ‘विजयसिंगे ही गोटी, वटवृक्षछायेस गोमटी ।
भगवंत मानोनिया जगजेठी । मांडोनिया खेळतसे ।
अर्थात विजयसिंग नावाचा तो बालक या वटवृक्षाछायेखाली भगवंत जगजेठी स्वतःच सोबत आहे असं समजून गोटी मांडून आनंदाने, कौतुकाने हा गोटी खेळ खेळत होता.  एक डाव स्वतः खेळून दुसरा डाव देवाला 'देवा बापा खेळ' असं सांगत होता आणि देवाचा डावही स्वतःच खेळत होता. असा खेळ खेळण्यात काही वेळ निघून गेला आणि त्याठिकाणी लहानमोठे लोक जमले. एकटाच खेळतो म्हणून ती लोक लांबूनच त्याला हसू लागली, बोलू लागली, चिडवू लागली. परंतु याची काहीच पर्वा न करता विजयसिंग मनात म्हणे तो भगवंतच माझ्याबरोबर खेळेल आणि या विचाराने भगवंताचे नाव घेऊन तो आनंदाने पुन्हा खेळ खेळू लागला आणि पुन्हा देवाला म्हणाला, 'देवा बापा खेळा आता!' दुसरीकडे  प्रत्यक्ष सर्वव्यापी परब्रह्म सर्वेश्वर हा कली मातल्याने अधर्माचा बिमोड करण्यासाठी, दीनभक्तांचा सांभाळ करण्यासाठी, जगदोद्धारासाठी आणि धर्मसंस्थापनार्थ अवतार घेणार असताना विजयसिंगाचा हा भोळाभाबडा भक्तीभाव पाहून अवतार घेण्याची वेळ आली आहे असे मनोमन म्हणाला.
पुढील हकीकत अशी की विजयसिंग भगवंताच्या नावाने एक गोटी त्या वटवृक्षस्थळी मांडून ठेवली आणि दुसरी गोटी हाती घेऊन पुन्हा खेळू लागला. अशावेळी अचानक मोठ्याने कडकड  असा भयावह आवाज होऊन कडकडाट झाला. ते ऐकून विजयसिंग आणि तेथील लोक भयभीत झाले. भीतीने सगळे आपापल्या घरी गेले. विजयसिंग मात्र एकटाच तिथे भयभीत आणि दिनमुखाने त्या भगवंताच्या नावाने मांडलेल्या गोटीकडे पाहत बसला. तितक्यात गोटीखालील धरणीतून ॐ ॐ शब्द येऊ लागला. सारखा सारखा ॐ ॐ हा मंजुळ ध्वनी कानी पडू लागल्याने आधी भयभीत झालेला विजयसिंग तो मंजुळ ॐ कार ऐकून शांत झाला. साक्षात जगाचा स्वामी मायबाप सर्वेश्वर धरणीमधून  मंजुळ असा ॐ कार देत होता. असा ॐ ॐ' ध्वनी येत नभी स्थळी सर्वत्र ॐ कार भरला आणि...आणि दुसऱ्या प्रहरी धरणी दुभंगून जगाचे स्वामी प्रत्यक्ष परब्रह्म ब्रह्मांडनायक राजाधिराज भगवंत आठ वर्षाच्या रुपात **ॐ ॐ' असा गजर करत एक हात कमरेवर आणि एका हातात गोटी घेऊन अष्टवर्षीय सुकुमार मनोहर रुपात वटवृक्षातळी प्रकट झाले. बोला 
'ॐ अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगिराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय!'
तो दिवस होता गुरुवार, चैत्र शुद्ध द्वितीया शके १०७१!
अशारितीने श्रीस्वामी महाराज प्रगट झाले. ही घटना श्रीस्वामी महाराजांनी श्रीस्वामीसुतांना दृष्टांतरुपाने दर्शवली. तो सविस्तरपणे अवतारकांडात वाचता येईल.
किंबहुना श्री स्वामीसुत महाराजांनीच "श्री स्वामी समर्थ जयंती उत्सव" सोहळा सर्वप्रथम म्हणजे इ.स. १८७० साली मुंबई अर्थातच मुंबापुरी मध्ये साजरा केला. त्याच्या पुढल्या वर्षी (इ.स. १८७१) हा उत्सव श्रीस्वामीसुत महाराजांनी अक्कलकोटमध्ये प्रत्यक्ष श्रीस्वामींसमक्षच साजरा केला होता. अहमदनगरचे स्वामी भक्त नाना रेखी जे स्वतः पिंगला जोतिष्य विद्येत पारंगत होते त्यांनी चैत्र शु. द्वितीया शालिवाहन शके १०७१ याच तिथी व सालानुसार श्रीस्वामींसमोरच प्रत्यक्ष ब्रह्मांडनायक श्रीस्वामी महाराजांची पत्रिका बनवली व स्वामींनीही त्या पत्रिकेस दुजोरा दिला असल्याचे स्वामी चरित्रातून उमगते. यावरून स्वामीसूतांनी सांगितलेल्या स्वामींच्या या प्रगटकथेला व वर्षाला (शके १०७१) श्री स्वामींनीच एकाअर्थी पुष्टी दिल्याचे स्पष्टपणे जाणवते. 

श्री आनंदनाथ महाराज हे असेच स्वामींचे अत्यंत जवळचे स्वामी कृपांकीत शिष्य होते. प्रसिद्धीपासून दूर राहण्याचा त्यांचा स्वभाव असल्याने फारशा स्वामीभक्तांना त्यांचे चरित्र ज्ञात आहे. म्हणून सर्वांना इथे मुद्दाम सांगू इच्छितो श्री आनंदनाथ महाराज स्वामींच्या सहवासात तब्बल ६ वर्षे होते व स्वामींवर त्यांनी अनेक अभंग, काव्ये, कवने, स्तोत्रे, आरत्या इ. लिहिले. श्री स्वामींची संपूर्ण कृपा त्यांच्यावर होती. श्री स्वामीकृपेने श्री स्वामी समर्थ महाराजांनी त्यांना स्वमुखातून आत्मलिंग पादुका काढून दिल्या. या पादुका वेंगुर्ला येथील स्वामी मठात असतात. स्वामी संप्रदायात श्री आनंदनाथ महाराजांचा अधिकार फार मोठा आहे. त्यांना श्री स्वामीकृपेने

झालेल्या श्री स्वामी महाराजांच्या प्रगटीकरणासंबंधीच्या दृष्टांतानुसार ते म्हणतात - 
शालिवाहन शके तीनशे चाळीस ।
शुद्ध पक्ष पूर्ण चैत्र मास ।
अवतार घेतला द्वितीयेस ।
वटछायेसी दिंगबरु ॥
श्री आनंदनाथ महाराज यांच्या दृष्टांतानुसार शालिवाहन शके ३४० चैत्र शु. द्वितीया या दिनी उत्तरेत हिमालयाच्या आसपास वटवृक्षाच्या छायेखाली "अष्टवर्षीय सुकुमार" रुपात श्रीस्वामी प्रगट झाले. श्री आनंदनाथ महाराजांनी सुचवलेले शके (वर्ष) आणि कथा थोडी वेगळी जरी असली तरी श्री स्वामीसुत महाराजांप्रमाणेच धरणीचा भार हरण्यासाठी वटवृक्षाछायेत अष्टवर्षीय बालकाच्या सुकुमार रुपात श्री स्वामी महाराज प्रगट झाले असेच श्री आनंदनाथ महाराज म्हणतात. 
पुढील अभंगांमध्ये त्यांनी श्री स्वामी प्रगटदिनाचा प्रसंग आणि त्याचे महत्व विशद केले आहे.

** श्री आनंदनाथ विरचित अभंग **

अष्टवर्षे सुकुमार ॥ रूप धरीले सुंदर ॥ १ ॥ 
धराभार हरावया ॥ बळे लावितसे पाया ॥ २ ॥ 
कोटी मदनाची प्रभा ॥ दिव्य मूर्तीचा हा गाभा ॥ ३ ॥ 
तेज प्रकटले फार ॥ देव पायींचे किंकर ॥ ४ ॥ 
मुनी करीती स्तवना ॥ शांत होई करुणाघना ॥ ५ ॥ 
जाणूनी देवाचा आकार ॥ स्थित झाले निराकार ॥ ६ ॥ 
गुप्त राहुनी अंतरी ॥ वटामाजी निर्धारी ॥ ७ ॥
आनंद म्हणे ऐसे सार ॥ मूळ ब्रह्मीचा अवतार ॥ ८ ॥ 
            - श्री आनंदनाथ महाराज   
 (हे संदर्भ फारच कमीस्वामीभक्तांना माहिती आहे, तरी जास्तीत जास्त शेअर करावे !) त्यादृष्टीने यावर्षीचा श्री स्वामी प्रगटदिन विशेष महत्त्वाचा आहे. 

श्री स्वामींच्या दृष्टांतानुसार श्री स्वामीसुत महाराजांनी तसेच श्री आनंदनाथ महाराज यांनी वर नमूद केलेले दोन्ही श्रीगुरू स्वामी जयंतीची प्रसंग वर्णिले आहे हे आपण या इथे मुद्दाम लक्षात घेतले पाहिजे. 


श्रीस्वामीसुत महाराज व श्रीआनंदनाथ महाराजा दोघांनीही श्रीस्वामी जयंतीला गुरुवार होता असं नमूद केलं आहे. आज योगायोगाने श्रीस्वामीजयंती व गुरुवार असे दोन्ही योग यावर्षीच्या श्रीस्वामी जयंती दिनी येत आहे. तसेच यंदा उत्सवाचे १५० वर्ष आहे. त्यामुळे या तिहेरी संबंधामुळे आजच्या या श्रीस्वामीजयंतीचे आणखीनच  विशेष महत्त्व आहे. 


त्याव्यतिरिक्त स्वामी कर्दळीवनात वारुळातून प्रगट झाले हि कथा सुद्धा खूप प्रचलित आहेच (आणि हल्ली वेगवेगळ्या कारणांनी याच कथेचा पर्यायाने कर्दळीवनाचा खूपच जोरदार प्रचार केला जाताना दिसतो) पण या कथेला सांप्रदायिक आधार नसून अनेक अधिकारी स्वामीभक्त व तसेच चरित्रकार  या कथेला कपोलकल्पितच मानतात. (त्याबद्दल पुन्हा कधीतरी नक्कीच सविस्तर लिहूच ) पण सध्यातरी ही कथादेखील स्वामीभक्तांमध्ये प्रचलित आहे हि गोष्ट नाकारता येत नाही. 


असे जरी असले तरी स्वामींबद्दल आपण प्रेमाने म्हणतो, "नाही जन्म, नाही नाम, नाही कुणी माता पिता, प्रगटला अद्भूतसा, ब्रह्मांडाचा हाच पिता" ! अगदी खरंच आहे ते. स्वामींना तशा अर्थाने जन्म नाही. ते तर प्रगट झाले. अशा कित्येकवेळा ते प्रगट झाले असतील. स्वामींनी समाधी घेतल्यानंतर निलेगांव नावाच्या एका गावात स्वामी प्रगट झाले होते हे स्वामीभक्तांना ठाऊक असेलच. त्यामुळे आजच्या दिवशी ते कसे प्रगट झाले आणि नेमके कधी प्रगट झाले याच्या फार खोलात आपण न शिरता स्वामीभक्तांमध्ये सर्वमान्य असलेल्या "चैत्र शुद्ध द्वितीया" या तिथीलाच आणि गुरुवारी श्रीस्वामीच्या जन्मवारी आलेल्या यंदाच्या श्री स्वामी जयंती उत्सवाला आपापल्या घरीच संपूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने, मोठ्या उत्साहाने साजरा करूया. स्वामींना शरण जाऊया आणि भारतावरच नव्हे तर अवघ्या जगावर आलेल्या कोरोनावायरसरुपी आलेले भीषण संकट दूर होऊन सर्वांना निरोगी निरायम दीर्घायुष्य लाभो आणि त्यांची सुकोमल चरणी ठाव द्यावा हेच साकडे आपण त्यांना घालूया.


स्वामी समर्था माझे आई ।

मजला ठाव द्यावा पायी ॥

ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ यांना पुन्हा एकदा त्रिवार वंदन आणि श्री स्वामी समर्थांची अखंड कृपा आपल्या सर्वांवर राहो हीच श्रीस्वामीचरणी प्रार्थना.


( कृपया हा लेख नावासहित, श्री स्वामी समर्थ भक्त परिवाराच्या लिंकसहित शेअर करावा म्हणजे लोकांना अशा आणखीन लेखांची देखील माहिती मिळेल.)


विशेष सूचना : श्रीस्वामी समर्थ महाराज तसेच श्री शंकर महाराज यांच्याशी संबंधित आणखीन दुर्मिळ व अस्सल (Exclusive & Authentic) माहितीसाठी व इतर अध्यात्मिक माहितीपर मेसेजेस वाचण्यासाठी आपल्या श्री स्वामी समर्थ महाराज परिवाराचे खालील फेसबुक पेजेस अवश्य लाईक करा अथवा व्हॉटसअप लिस्टला जॉईन व्हा. त्याकरिता खालील नंबरवर SMS करावा. तसेच आमचे टेलिग्राम चॅनेल आवर्जून जॉईन करावे.

🔸 WhatsApp : 9821941819
🔹 श्री स्वामी समर्थ परिवार फेसबुक पेज
https://fb.me/swamimajha 
🔸 Blog : http://swamisamarthparivar.blogspot.in
🔹 Telegram Channel Shree Swami Samarth Parivar 
https://t.me/swamisamarthparivar 

तसंच अधिकाधिक लोकांना व ग्रुपमध्ये हा मेसेज फेसबुक, व्हॉटसऍप इ. माध्यमाद्वारे या दोन्ही लिंकसकट व संपूर्ण आवाहनासहित शेअर करावी ही नम्र विनंती.


॥ राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय ॥ 


आपले नम्र

श्री स्वामी समर्थ भक्त परिवार, फेसबुक समूह https://www.facebook.com/swamimajha

Wednesday, March 18, 2020

श्री स्वामी समर्थ संप्रदायाची अनमोल स्तोत्रे

॥ श्री स्वामी समर्थ ॥

देतो तुम्हा घ्या रे अमोल मोलाचे ।
भवालागी साचे कामा येत ॥
.            - श्री आनंदनाथ महाराज

भवसागर तरून जाण्यासाठी खरोखरच अमोल मोलाची अशी ही स्तोत्रे तुमच्या हाती आज सुपूर्द करत आहे.
वरील मेसेजेस मध्ये उल्लेख केलेल्या सर्व स्तोत्रांची पीडीएफ (PDF) फाईल्स माझ्या गुगल ड्राइव्हवर अपलोड केल्या असून त्याची लिंक सर्वांसाठी पाठवत आहे !
केवळ चैत्र महिन्यातच नव्हे तर एरव्ही देखील वर्षाचे १२ महिने श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नित्य उपासनेमध्ये असायला हव्यात अशा या सिद्ध रचना आहेत.

री सर्व स्वामीभक्तांनी अवश्य लाभ घ्यावा.

१. श्री आनंदनाथ विरचित गुरुस्तवन
https://goo.gl/1PuF9u

२. श्री आनंदनाथ विरचित स्वामीपाठ
https://goo.gl/7TpyYr

३. श्री स्वामीसुत विरचित स्वामीपाठ
https://goo.gl/hJJXhX

४. श्री आनंदनाथ महाराज रचित श्री स्वामी चरित्र स्तोत्र
https://goo.gl/xF74ZW

५. श्री स्वामी समर्थ तारक मंत्र
http://bit.ly/2xQAzeZ

** *श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण (PDF)* **
http://bit.ly/3d7Wa2N

आपला नम्र,
प्रथमेश लोके (9821941819)
श्री स्वामी समर्थ भक्त परिवार, समूह

Friday, December 7, 2018

"मासानां मार्गशीर्षोऽहम्।"

॥ श्री गुरुदेव दत्त ॥    
॥ श्री स्वामी समर्थ ॥
॥ येळकोट येळकोट जय मल्हार ॥

आज शनिवार, मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ! मार्गशीर्ष मासारंभ !! (दि. ८ डिसेंबर २०१८ ) वैदिक काळापासून मार्गशीर्ष महिना अत्यंत पवित्र मानला जातो. अशा या पवित्र मार्गशीर्ष महिन्याचा प्रारंभ आजपासून होत आहे. आजचा दिवस हा देव दीपावली (देवदिवाळी) म्हणून देखील ओळखला जातो. मुख्यत: चित्तपावनांमध्ये कुलदैवत, ग्रामदैवत यांना भजण्याचा हा दिवस होय. 

आजच्या दिवशीच महाराष्ट्राचे आराध्य दैवत मल्हारी मार्तंड भैरवाचे म्हणजेच खंडेरायाचे षडरात्रोत्सव (मल्हारी नवरात्री) अर्थात चंपाषष्ठीच्या नवरात्रास प्रारंभ होत आहे. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत चंपाषष्ठीचे असे सहा दिवस हे नवरात्र असते म्हणून याला षडरात्रौत्सव असे देखील अधिक संयुक्तीकपणे म्हटले जाते. जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात व भक्तिभावाने साजरा होतो. 

मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व खरोखरच अपरंपार आहे. गीतेमध्ये तर स्वत: भगवान श्रीकृष्णाने "मासानां मार्गशीर्षोऽहम्।"  असे म्हटले आहे. याचाच अर्थ असा की मार्गशीर्ष महिना माझेच (भगवान श्रीकृष्णाचे) स्वरूप आहे. स्कंद पुराणात देखील या महिन्याचा महिमा गायला आहे. भगवान विष्णुला प्रसन्न करण्यासाठी उपासना करण्यासाठी हा अत्यंत अनुकूल महिना आहे. याच महिन्यातील शुद्ध एकादशीला "मोक्षदा एकादशी" असेही म्हणतात. याचदिवशी श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली म्हणून या मोक्षदा एकादशीलाच "गीता जयंती" असेही म्हणतात. कदाचित जगाच्या पाठीवर भगवद्गीता हा एकमेव ग्रंथ असावा ज्याची जयंती साजरी केली जाते.

भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या श्रीरामाचा यांचा विवाह सीता मातेशी याच महिन्यात शुद्ध पंचमी दिवशी झाला. म्हणून हा दिवस "विवाह पंचमी" म्हणून साजरा केला जातो.

भगवान विष्णूची पत्नी अर्थात श्री महालक्ष्मी हिचे श्री महालक्ष्मी व्रत देखील याच महिन्यात मोठ्या प्रमाणात महिला घरोघरी करतात. 

याच महिन्यात मार्गशीर्ष पौर्णिमेला श्रीदत्त जयंती साजरी केली जाते. म्हणून दत्तपरंपरेत या महिन्याचे विशेष महत्त्व आहे. भारतीय भक्तीपरंपरेच्या उन्नतीमध्ये भगवान श्री दत्तात्रेय एक अनोखे अवतार आहेत. "ब्रह्मा-विष्णू-महेश" यांचा तिघांचा एकत्रित अवतार म्हणजे "भगवान दत्तात्रेय" होय. "रज-तम-सत्व" या त्रिगुणांच्या, "इच्छा-कर्म-ज्ञान" या तीन भावांच्या आणि "उत्पत्ति-स्थिति-लय" या तीन अवस्थांच्या एकत्रित रूपामध्ये ते विराजमान आहेत. 
भक्ताने स्मरण करताच भगवान दत्तात्रेय धावून येतात अशी दत्तभक्तांची अढळ श्रद्धा आहे म्हणून श्रीदत्तात्रेयांना "स्मर्तुगामी" किंवा "स्मरणगामी" असेही म्हणतात.

मार्गशीर्ष महिन्यात ही श्रीदत्तजयंती येत असल्याने सर्व दत्तभक्तांमध्ये व दत्त परंपरेमध्ये या महिन्याचे विशेष महत्व आहे. दत्तभक्तांसाठी भगवान दत्तात्रेयांची उपासना, आराधना करून त्यांना प्रसन्न करण्यासाठी हा महिना अत्यंत सुयोग्य असा महिना मानला जातो. विशेषतः "मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी से मार्गशीर्ष शु. चतुर्दशी" या सप्ताहात गुरुचरित्राचे पारायण भाविक प्रामुख्याने करतात. या सप्ताहाला "श्रीदत्त जयंती सप्ताह" किंवा "श्री गुरुचरित्र सप्ताह" असेही म्हणतात. या महिन्यामध्ये  आणि प्रामुख्याने या सप्ताहामध्ये 
 "दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।" या श्रीदत्त संप्रदायाचा महामंत्राचे नामस्मरण तर केले जातेच. त्याचप्रमाणे सामुदायिक नामस्मरण तसेच अखंड नामस्मरण अशा कार्यक्रमांचे तसेच अन्य धार्मिक-अध्यात्मिक कार्यक्रमांचे देखील आयोजन मोठ्या प्रमाणावर केले जाते. या महिन्याचे अध्यात्मिक महत्त्व लक्षात घेऊन व या श्रीदत्तजयंती सप्ताहाचे औचित्य साधून श्रीस्वामीकृपेने आपल्या "श्री स्वामी समर्थ भक्त परिवार" समूहाच्या व श्री विठ्ठल सायन्ना श्रीदत्त मंदिराच्या "यादव कुटुंबीय" यांच्या संयुक्त विद्यमाने "रविवार दि. १६ डिसेंबर २०१८ रोजी सकाळी ९:३० वाजता" ठाणे शहरातील विठ्ठल सायन्ना दत्त मंदिर येथे "सामुदायिक नामस्मरण सोहळ्याचे" आयोजन केले आहे. या विशेष सोहळ्याचा देखील सर्व भाविकांनी अवश्य लाभ घ्यावा.

या कार्यक्रमाची  माहिती पुढीलप्रमाणे :-

** जाहीर निमंत्रण : सामुदायिक नामस्मरण सोहळा **
रविवार दि. १६ डिसेंबर २०१८, 
वेळ : सकाळी ९.३० ते दु.१२:३० वा.
स्थळ : विठ्ठल सायन्ना दत्त मंदिर, 
शुभा रेस्टॉरंटच्या समोर, दमानी इस्टेट, नौपाडा, 
लाल बहादूर शास्त्री मार्ग, ठाणे (प) ४००६०२. 
संपर्क - प्रथमेश लोके : 7021942657  
(कृपया संध्या. ५ नंतरच संपर्क करावा)
प्रवेश विनामूल्य ! नाव नोंदणी आवश्यक !
 इच्छूकांनी आपले नाव या लिंकवर ऑनलाईन नोंदवावे : http://bit.ly/thane18

तरी ज्यांना शक्य आहे अशा सर्वांनी या श्रीदत्तजयंती सप्ताह विशेष नामस्मरण सोहळ्याचा अवश्य लाभ घ्यावा. इच्छूकांनी वरील लिंकवर नावनोंदणी करावी. काही अडचण आल्यास मात्र तुम्ही 7021942657 या नंबरवर SMS द्वारे (WhatsApp द्वारे नाही!) नोंदणी करू शकता. 

तर अशा या मार्गशीर्ष महिन्याचे महत्व खरोखरच अपरंपार आहे. त्याचे जितके वर्णन करावे तितके कमीच. मी माझ्या अल्पकुवतीनुसार या महिन्याचा महिमा सांगण्याचा प्रयत्न केला. आपणां सर्वांनी देखील या काळात भगवान दत्तात्रेयांची, दत्तावतारी श्री स्वामी समर्थांची उपासना करून त्यांना प्रसन्न करावे हीच मनोमन इच्छा आहे. 

अशा या पावन देव दिपावलीच्या दिवशी आपले कुलदैवत,  श्री दत्तगुरु महाराज, श्री स्वामी समर्थ महाराज आणि श्री मल्हार मार्तंड भैरव महाराजांच्या चरणी सादर सप्रेम दंडवत. भगवान श्री दत्तात्रेयांची, श्री स्वामी समर्थ महाराजांची, खंडेरायांची आपल्यावर व आपल्या संपूर्ण कुटुंबीयांवर सदैव कृपा राहो हीच दत्तचरणी प्रार्थना.

॥ श्री गुरुदेव दत्त ॥
॥ श्री स्वामी समर्थ ॥
॥ येळकोट येळकोट जय मल्हार ॥

आपला नम्र,
प्रथमेश लोके (7021942657)
श्री स्वामी समर्थ भक्त परिवार, समूह

अशा अध्यात्मिक विशेषतः श्री स्वामी समर्थ व श्री दत्तात्रेय महाराजांविषयी पोस्ट्स वाचण्यासाठी खालील
फेसबुक ग्रुप (समूह) तसेच WhatsApp लिस्ट अवश्य जॉईन करा.

ग्रुप : https://www.facebook.com/groups/swamisamarthparivar
WhatsApp मार्फत अपडेट्स मिळवण्यासाठी या 7021942657 क्रमांकावर SMS करून नाव नोंदवावे.

विशेष सूचना : असे अध्यात्मिक माहितीपर संदेश पुढे पाठवणे व इतरांशी शेअर करणे ही देखील भगवंताची सेवाच आहे हे जाणून हा संपूर्ण संदेश नावासहित व कुठलीही काटछाट न करता आवर्जून फेसबुक, व्हॉटसअप ग्रुप्समध्ये अधिकाधिक  शेअर करावा ही नम्र विनंती. जेणेकरून अधिकाधिक लोकांपर्यंत या मार्गशीर्ष महिन्याचा महिमा पोहोचेल.)

Sunday, April 22, 2018

** अशी घेतली शंकर महाराजांनी समाधी **


आज वैशाख शु. ८ (दुर्गाष्टमी) (सोम. दि. २३ एप्रिल २०१८) ! श्री शंकर महाराजांचा ७१ वा समाधी दिन !  या दिनानिमित्त सर्व भक्तांसाठी हा विशेष लेख प्रस्तुत करत आहोत.
अवश्य वाचा व जास्तीत जास्त शेअर करा.
पुण्यातील स्वारगेटकडून कात्रजकडे जाणाऱ्या रस्त्यावर, स्वारगेटपासून साधारण तीन-साडे तीन किमी अंतरावर डाव्या हाताला एक मठ लागतो. हाच सदगुरू श्री शंकर महाराजांचा समाधी मठ ! 
** *अशी घेतली शंकर महाराजांनी समाधी* **
श्री शंकर महाराजांनी बापू नावाच्या भक्ताला पर्वतीवर गुरुचरित्राचे उलटे पारायण अष्टमीपासून सुरु करायला सांगितले. सप्तमीला एक कप चहा घेतला. एका खोलीत छोटी गादी घातली. एक तक्या ठेवला। आंघोळ करून त्या खोलीत जाताना सांगितले दार लावून घ्या. मी कोणाला भेटणार नाही. मला बोलायचे नाही. कोणी आले तरी दार उघडू नका. सकाळी ठीक १० वाजता महाराज खोलीत गेले. ढेकणे मामींनी दार लावून घेतले. दाराजवळ दोघे पहारा देत होते. रात्रभर ढेकणे मामा मामी घोंगडीवर बसून होते. पहाटे आतून आवाज आला. माझी आत्मज्योत आता अनंतात विलीन होत आहे. पुढील सोय करा. महाराजांनी सांगितल्या प्रमाणे अष्टमीला आपला देह सोडला. संपूर्ण पुण्यात बातमी पसरली भक्तांचे लोंढे धावत आले. भक्तांना रडू आवरत नव्हते. न्यायरत्न विनोद तांब्याची तार घेवून आले. त्यांनी त्या तारेचे एक टोक महाराजांच्या छातीला आणि दुसरे टोक कानाला लावले. त्यातून आवाज आला. "आत्मकलेपैकी एक कला जगकल्याणासाठी समाधी स्थानांत सदैव राहील !" आणि श्री ज्ञानेश्वर माऊलींचे वचन आशीर्वाद म्हणून ऐकू आले, "जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥"  ज्ञाननाथ रानडे यांना महाराजांचा संदेश आला. आळंदी, जंगली महाराज, माळी महाराज, सोपानकाका, ओंकारेश्वर व पद्मावती या तीर्थक्षेत्रांचे निर्माल्य माझ्या समाधी स्थानात आणून टाकावे. ज्ञाननाथ रानडे यांनी गाडी घेवून अडीज तासात निर्माल्य आणले. मामा ढेकणे व मामी यांना दु:खाचा वेग आवरेना. त्यांच्या घरापासून काका हलवाई, दत्त मंदिर, ग्लोब सिनेमा, श्री अक्कलकोट स्वामी मठ, मंडई, शनिपार पर्वती, अरणेश्वर, पद्मावती आणि शेवटी मालपाणीच्या शेतात धनकवडीला महाराजांची अंतयात्रा आली. भस्मे काका, दादा फुलारी, डॉक्टर शुक्ला, डॉक्टर धनेश्वर या चौघांनी महाराजांचा देह खांद्यावर घेवून समाधीच्या जागेपर्यंत आणला. त्या वेळी दादा फुलारींना श्री शंकर महाराजांनी आपल्या हाताच्या कोपराने धक्का दिला व म्हटले, "अरे मला निट धर." फुलारी दादांनी दचकून महाराजांकडे पहिले. समाधीत ठेवताना मारुती माळी महाराजांनी त्यांचे अखेरचे दर्शन घेतले. त्यांना ते हनुमंताच्या अर्थात मारुतीरायाच्या रुपात दिसले. त्यावेळी माळी महाराज म्हणाले, "भक्तीच्या वाटा जगाला दाखवण्यासाठीच आपण हे रूप घेतले काय?" सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास महाराजांच्या पार्थिव देहाला समाधी गुफेत ठेवले. "ॐ अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज सदगुरू श्री शंकर महाराज की जय" अशाघोषात टाळ मृदुंगाच्या गजरात आसमंत निनादून गेला.  (वरील हे वर्णन ज्ञाननाथजीच्या पुस्तकातील आहे.)
समाधीत ठेवल्यावर बाबुराव रुद्र त्या समाधीच्या रात्री त्या घनदाट अंधारात भयाण जंगलात न घाबरता समाधी सोबत राहिले. सारी भक्त मंडळी घरी निघून गेली. महाराजांच्या तीन पादुकांपैकी एक समाधी मंदिरात, एक सोलापूरच्या जक्कलांच्या मळ्यातील दत्त मंदिरात व एक सोलापूरच्या शुभराय मठात ठेवली. प्रथम समाधी बांधली गेली. नंतर एक पत्र्याची शेड. असे करता करता असे आजचे भव्य दिव्य समाधी मंदिर उभे राहिले.
आजही मनोभावे हाक मारली असता समाधी घेतलेले सद्गुरू श्री शंकर महाराज समोर उभे राहतात हे खास वैशिष्ट्य आहे. आपली लीला आजही कश्या प्रकारे दाखवतील याचा काही नेम नाही. अनेकांना याचा अनुभव आला आहे. आणि तसे त्यांनी आपल्या पुस्तकात लिहून ठेवले आहे.
श्री शंकर महाराजांचे समाधी नंतरचे अस्तित्व -
शंकर महाराज समाधी घेतल्या नंतर सुद्धा भक्तांना भेटू लागले. स्वप्नात जाऊन मार्गदर्शन करू लागले. एका भक्ताला कुंपणाजवळ दर्शन दिले. व एका भक्ताला समाधी मठात विराट रुपात दर्शन दिले. १९४५ साली दिगंबर सरस्वती राजयोगी अन्ना महाराजांच्या दर्शनास गेले असता मी २१ वर्षांनी तुझ्याकडे दर्शनास येईन असे सांगितले होते. १९६६ साली वाघोड ला उत्सवात श्री शंकर महाराज भेटले त्यांना घेवून रावेर येथे आले. तेथे सर्वांनी पाद्यपूजा केली. नैवेद्य दिला. वाजंत्री आणली. अन्ना महाराज व वाघोडकरांचा अष्टभाव जागा झाला. नंतर त्याच्या घरी मुंबईला महाराजांना आणले. त्याच्या उपस्थितीत श्री अनंत काळकर व जयश्री इखे यांचा साखरपुडा झाला त्यावेळी शंकर महाराजांनी त्याच्या सासऱ्याला टोपी व रुमाल भेट दिला आणि ते निघून गेले. त्या दिवसापासून घरची परिस्थिती चांगली झाली. आज मुलुंड येथे टोपी व रुमाल श्री रमेश इखे यांच्या घरी जपून ठेवला आहे. सौ. उमाताई व श्री शंकरराव नेरुरकर (दादर, मुंबई येथील प्रसिद्ध आयडियल बुक डेपो कंपनीचे मालक) हे दोघे १९८९ साली श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या दिवशी (चैत्र शु. द्वितीया) रात्री २ वाजता बोरीवली येथे L.I.C. कॉलोनी येथून घरी येत असता, दाट अंधारात गर्द झाडीतून अचानक श्री शंकर महाराज बाहेर आले. सिगारेट व माचीस घेवून झाडीत अदृश्य झाले. असा हा अनपेक्षित प्रसंग पाहून दोघे स्तब्ध होवून पहात राहिले. धनकवडीच्या समाधीचा परिसर पूर्वी जंगलाचा होता. वाघ नेहमी येत. पण कोणाला कसलीही इजा झाली नाही. महाराजांचे भक्त दत्तात्रेय गणेश अभ्यंकर यांना रात्री समाधीतून बाहेर येउन दर्शन दिले. महाराज समाधीतून बाहेर आले व आपला पाय हंडीपर्यंत नेउन हंडी हलवली. हे अभ्यंकरानी समाधी नंतर ३ वर्षाने अष्टमीच्या रात्री पाहिले. अभ्यंकरांची मुलगी आजारी असताना महाराज घरी आले व अभ्यंकराना भेटले. टोपी चपला सोडून संडासात गेले. लगेच त्यांनी चप्पल टोपी पेटीत लपवून ठेवल्या बराच वेळाने संडासात पहिले तर महाराज तिथे नव्हते. व पेटीतील लपवून ठेवलेली चप्पल टोपी नाहीशी झाली. पुण्याच्या लाकडी पुलावर एका माणसाला श्री शंकर महाराज नावाने एक माणूस भेटायचा. दोघांची छान मैत्री जमली. दोघे गप्पा मारत बसायचे.  नाव-गाव विचारल्यावर तो गृहस्थ "मी शंकर महाराज ! धनकवडीला राहतो" म्हणून त्या व्यक्तीने सांगितले. दोन दिवस श्री शंकर महाराज आले नाहीत म्हणून तो शोधत धनकवडीला समाधी मठात आला. बाबुराव रुद्रांनी महाराजांची समाधी दाखवली. ऐकुन गृहस्थ थक्क होतो. तो रुद्रांना सांगतो, की महाराज रोज लाकडी पुलावर येतात. ते आज आणि काल आले नाहीत म्हणुन चौकशी करायला आलो. रूद्र त्यांना सांगतात की महाराजांनी आठ वर्षांपूर्वीच समाधी घेतली आहे. हि महाराजांची लीला ऐकून तो गृहस्थ व रुद्र दोघेही थक्क झाले. तो गृहस्थ समाधी समोर पाया पडून निघून गेला.
सोलापूर दक्षिण कसबा पेठेत राहणारे श्री दादा फुलारी सौर्गावकर यांना महाराजांनी समाधी नंतर त्याच्या घरी जावून चहा व सिगारेट अंगावरचा सदरा व पायजमा मागितला. तो दिल्यावर चल माझ्या बरोबर असे सांगितले. सौर्गावकर गेले नाहीत. पण त्या नंतर ८ दिवसांनी सौर्गावकरांनी देह ठेवला.
"श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ" हा  माझ्या गुरूचा जप
आहे असे श्री शंकर महाराज म्हणत. "माझा गुरु व मी वेगळा नाही. जो माझ्या गुरुचा जप करेल त्याचे सर्वच मनोरथ पूर्णच करावयाची जबाबदारी माझी राहील. माझे स्मरण करा. व माझा अनुभव घ्या." ही महाराजांची वचने आहेत. श्री शंकर महाराजांची ही वचने आजही खरी ठरतात.
(आंतरजालावरून संकलीत)
संकलन व संपादन : प्रथमेश लोके (7021942657)
श्री स्वामी समर्थ भक्त परिवार, फेसबुक समूह
(कृपया हा लेख दिलेल्या लिंकसकट व संपूर्ण आवाहनासहित शेअर करावी जेणेकरून पुढील लेख देखील सर्वांना मिळू शकतील.)
श्री शंकर महाराजांची प्रचिती वेळोवेळी लोकांना येत आहे आणि म्हणूनच की काय श्री शंकर महाराजांचा भक्त परिवार जा दिवसागणिक वाढतच चालला आहे. म्हणूनच श्री शंकर महाराज महाराज यांच्या समाधी दिनाच्या या अत्यंत पावन दिनी श्री शंकर महाराजांच्या कार्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी "श्री शंकर महाराज परिवार" या फेसबुक पेजची निर्मिती आम्ही "श्री स्वामी समर्थ भक्त परिवार" फेसबुक समूहच्या माध्यमातून करत आहोत. (Page : fb.me/shreeshankarmaharaj ) या फेसबुक पेजवर राजाधिराज श्री स्वामी समर्थ महाराज, सद्गुरू श्री शंकर महाराज विशेष माहितीपर लेख केले जाईल. जिज्ञासू स्वामीभक्तांनी जरूर त्याचा लाभ घ्यावा. पेजची लिंक पुढील प्रमाणे आहे : fb.me/shreeshankarmaharaj
श्री स्वामी समर्थ महाराज व श्री शंकर महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व आपल्या सर्वांच्या सहकार्याने निश्चितच या उपक्रमास सुयश लाभेल याची खात्री आहे. पुन्हा एकदा आजच्या या पावन दिनी, सद्गुरु श्रीस्वामींचे महान शिष्य श्री शंकर महाराज यांच्या सुकोमल श्रीचरणीं अनंत दंडवत प्रणाम !
संकलन : प्रथमेश लोके
श्री स्वामी समर्थ भक्त परिवार, समूह
(WhatsApp : 7021942657)
(FB https://www.fb.com/shreeswamisamarth)
(Shankar Maharaj Page : fb.me/shreeshankarmaharaj)
राजाधिराज श्रीस्वामी समर्थ महाराजांशी तसेच श्री सद्गुरू शंकर महाराजांशी संबंधित आणखीन दुर्मिळ व अस्सल (Exclusive & Authentic) माहितीसाठी व इतर अध्यात्मिक माहितीपर मेसेजेस वाचण्यासाठी आपल्या श्रीस्वामी समर्थ  भक्त परिवाराचे खालील फेसबुक पेज अवश्य लाईक करावे, व्हॉटसअॅप लिस्टला जॉईन व्हावे किंवा ब्लॉगला फॉलो करावे.
WhatsApp : 7021942657
Facebook Page: https://www.facebook.com/shreeswamisamarth
Blog : https://www.swamisamarthparivar.blogspot.com
तसंच अधिकाधिक लोकांना व जास्तीत जास्त ग्रुप्समध्ये हा मेसेज फेसबुक, व्हॉटसऍप इ. माध्यमाद्वारे या दोन्ही लिंकसकट व संपूर्ण आवाहनासहित शेअर करावी ही नम्र विनंती.
॥ ॐअनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय ॥
॥ राजाधिराज योगीराज श्री सद्गुरू शंकर महाराज की जय ॥
आपले नम्र
श्री स्वामी समर्थ भक्त परिवार, फेसबुक समूह
https://www.facebook.com/groups/shreeswamisamarth

Friday, April 13, 2018

** *श्री स्वामी समर्थ महाराजांचा १४० वा समाधी दिन* (विशेष लेख) **

** *श्री स्वामी समर्थ महाराजांचा १४० वा समाधी दिन* **
** *(विशेष लेख व श्री स्वामी समाधी दर्शन ! अवश्य वाचा व शेअर करा)* **

आज चैत्र कृष्ण त्रयोदशी ! ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराजांचा १४० वा समाधी लीला दिन (१४ एप्रिल २०१८) !! श्री स्वामी महाराज आपल्यातून मुळात गेलेच नाही त्यामुळे आपण या दिवसाला मुद्दामून पुण्यतिथी असे न म्हणता समाधी लीला दिन असे म्हणत आहोत.  श्री स्वामी समर्थ महाराज जरी सदैव आपल्यामध्ये असले तरीही स्वामींनी याच दिवशी समाधी ग्रहण करण्याची लीला केली. त्यामुळे या दिवसाचे विशेष महत्त्व तर आहेच पण उपासनेसाठी देखील आणखीन एक दिवस सर्व स्वामीभक्तांना या समाधी लीलेच्या निमित्ताने या दिवशी मिळाला आहे.

चला तर अाजच्या दिवशी अक्कलकोट येथील ब्रह्मांडनायक श्री स्वामींच्या समाधीचे दर्शन घेऊया, श्री स्वामींचे पुण्यस्मरण करूया व सोबत श्री स्वामी समाधी प्रसंगाचे वर्णन करणारा हा अप्रतिम लेख सर्वांनी वाचूया आणि शेअर करून सर्वांना तो वाचायला देऊया. श्री स्वामी समर्थ.

*[श्री स्वामी समाधी दिनानिमित्त हा विशेष लेख. कृपया लेख पूर्ण वाचा व शेअर करा.]*


(श्री स्वामी समर्थ समाधी मंदिर, अक्कलकोट)


** *हम गया नही, जिंदा है* ** 
** *(लेखक- श्री. विवेक दिगंबर वैद्य)* **

अक्कलकोटचे श्रीस्वामीसमर्थ महाराजांच्या समाधीग्रहणाला १४ एप्रिल २०१८ अर्थात चैत्र कृ. १३ रोजी १४० वर्षे पूर्ण होत आहेत. कळिकाळाच्या क्षणिक झोपेतही सर्व भक्तांच्या योगक्षेमाची काळजी घेण्याची आश्वासकता जपणाऱ्या महाराजांच्या निर्याणासंबंधी धीचा "यांनी लिहिलेला हा विशेष लेख.

सलगर येथून परतलेले स्वामी महाराज अक्कलकोटास आले आणि उतरले ते थेट ‘संतांचा मठ’ येथे. त्या परिसरातच असलेल्या एका लिंगायत साधूच्या समाधीस्थानापाशी स्वामी महाराजांची स्वारी अंमळ विश्रांतीसाठी पहुडली. स्वामी अक्कलकोटास परतले याची बातमी कानी आल्यावर, त्यांच्या दर्शनासाठी ताटकळत असलेले भक्तगण लागलीच संतमठाच्या दिशेने धावले. स्वामींच्या निद्रीस्त मुद्रेकडे भावपूर्ण, श्रद्धायुक्त वृत्तीने पाहत सर्वजण त्यांच्या नामस्मरणात दंग झाले. काही वेळाने स्वामी जागृतावस्थेत आले तेव्हा नित्य दर्शनासाठी भक्तांची रीघ लागली.

वातावरणात उत्सवी रंग भरला गेला. ठाकुरदासबुवा कीर्तनासाठी उभे राहिले. सुमारे एक प्रहर कीर्तनाचा ‘गजर’ घुमला. सोबत बावडेकर पुराणिकबुवाही होते. स्वामींचे लक्ष एकाएकी त्यांच्यापाशी गेले तसे स्वामींनी बुवांना चार टोपल्या गोवऱ्या आणण्यास सांगितले. स्वामी महाराजांच्या सांगण्यानुसार सेवेकऱ्यांनी लिंगायत साधूच्या समाधीस्थानावरील शिवलिंगाच्या वर आणलेल्या गोवऱ्या रचून ठेवल्या. शिवलिंग त्या गोवऱ्यांच्या राशीखाली दिसेनासे झाले तेव्हा स्वामी आज्ञेनुसार त्यावर मणभर तूप ओतवले गेले. भक्तांनी प्रसादरूपाने समोर ठेवलेल्या खारका, नारळ, सुपाऱ्या देखील स्वामींनी गोवऱ्यांवरच ठेवण्यास सांगितल्या. एवढा जामानिमा झाल्यावर स्वामींनी त्या गोवऱ्यावर अग्नी पेटविला. ही वेळ संध्याकाळची. तो संपूर्ण दिवस स्वामी महाराज उपाशीवस्थेत होते. आगीचा कल्लोळ झाला. रात्रभर गोवऱ्या विलक्षण आवेगाने जळत राहिल्या. इथे आपल्या साधूच्या समाधीवर गोवऱ्या पेटवण्यात आल्याचे वृत्त कळताच लिंगायत समाजातील काही मंडळी रागारागाने तिथवर येऊन पोहोचली. मात्र स्वामी महाराजांचे मुखतेज पाहून ही मंडळी जेथल्या तिथेच स्तब्ध होऊन उभी राहिली. त्यांच्या जणू चित्तवृत्तीचाच पालट झाला होता. चहूबाजूने भडकलेली आग अखेर स्थिरावली. दिवस उजाडल्यावर स्वामी महाराजांनी भुजंगा सेवेकऱ्याकरवी त्या परिसरातील राख झटकून, साफ करून शिवलिंग व समाधी पाण्याने धुवून स्वच्छ करून घेतली. आगीच्या कल्लोळात दगडी शिवलिंगाचे तुकडे तुकडे झाले असावेत असा एव्हाना सर्वाचाच ग्रह झाला होता. मात्र घडले ते निराळेच. शिवलिंग अधिकच तेजाने उजळून निघाले होते. आगीच्या कठोर धगीमुळे समाधी मंदिराच्या भिंतीचे चिरे तडकले होते, दरवाजास भेगा पडल्या होत्या. मात्र शिवलिंग अभंग राहिले, उलट तेजाने झळाळून उठले.
स्वामी महाराजांच्या या कृतीचे आकलन कुणासही झाले नाही. आजपर्यंत कुणा सत्पुरुषाच्या हातून हे घडले नव्हते आणि पुढे कधी घडले देखील नाही. स्वामी महाराजांना नक्की काय सुचवायचे होते? जे घडले ते शुभसूचक होते की अशुभाची नांदी? घडल्या प्रकाराने स्वामी महाराज विचलित झालेलेही कुणाला जाणवले नाही. ते त्यांच्या नित्य ब्रह्मतत्त्वाच्या रंगात मिसळून गेले होते. हे जरी खरं असलं तरी त्यांच्या अंतरंगाशी एकरूप झालेल्या त्यांच्या भक्त मंडळींपकी काही मोजकीच मंडळी अशी होती की या घटनेमुळे त्यांच्या सर्वागावरून अशुभाचा वारा फडफडून गेला. क्षणभरासाठी का होईना.. त्यांच्या समोर अदृश्याची काळी सावली प्रगटली आणि विरून देखील गेली. क्षणभरासाठी का होईना.. वाऱ्याच्या एका चुकार झुळकेमध्ये त्या सर्वानाच अरिष्टाचा दर्प जाणवला. क्षणभरासाठीच का होईना.. त्या सर्वाच्या मनात एकाच वेळी भविष्याचे अस्पष्ट पडसाद उमटले, ‘स्वामी अवताराची अखेर होणार काय?’ सर्वानी एकाच वेळी झर्रकन स्वामींच्या दिशेने पाहिले तेव्हा स्वामी महाराजांच्या मुखावर मिस्कील हास्य विलसत होते.

कुणीतरी बाळाप्पा यांना सांगून गेले की स्वामी महाराज मुरलीधराच्या देवळानजीक असलेल्या एका तळ्यामध्ये उतरून त्यांच्या सोबत असलेल्या सेवेकऱ्यांना एक दगडाची कुंडी पाण्यात बुडविण्यास सांगितले आणि सेवेकऱ्यांनी तसे करताच एकाएकी मोठय़ांदा ‘सर्व मंडळी रडा, बोंबा ठोका’ असाही पुकारा स्वामींनी केला. त्या माणसाचं ते कथन ऐकून बाळप्पाच्या मनात चर्र झालं.
काही दिवसांपूर्वी स्वामी महाराजांनी आपणांस ‘आम्हांला उंच उंच जावयाचे आहे. फार लांब जावयाचे आहे.’ असे सांगितल्याचे बाळाप्पांना आठवले. त्यामागोमाग कुणा सेवेकऱ्याने ‘स्वामी महाराज आजकाल चौकोनी खडे बाजूबाजूला मांडून समाधी स्वरूप आकार तयार करतात’ अशी बातमी दिल्याचेही आठवले आणि त्याचसोबत काही दिवसांपूर्वी स्वामींनी कुणीतरी बाळाप्पा यांना सांगून गेले की स्वामी महाराज मुरलीधराच्या देवळानजीक असलेल्या एका तळ्यामध्ये उतरून त्यांच्या सोबत असलेल्या सेवेकऱ्यांना एक दगडाची कुंडी पाण्यात बुडविण्यास सांगितले आणि सेवेकऱ्यांनी तसे करताच एकाएकी मोठय़ांदा ‘सर्व मंडळी रडा, बोंबा ठोका’ असाही पुकारा स्वामींनी केला. त्या माणसाचं ते कथन ऐकून बाळप्पाच्या मनात चर्र झालं.

काही दिवसांपूर्वी स्वामी महाराजांनी आपणांस ‘आम्हांला उंच उंच जावयाचे आहे. फार लांब जावयाचे आहे.’ असे सांगितल्याचे बाळाप्पांना आठवले. त्यामागोमाग कुणा सेवेकऱ्याने ‘स्वामी महाराज आजकाल चौकोनी खडे बाजूबाजूला मांडून समाधी स्वरूप आकार तयार करतात’ अशी बातमी दिल्याचेही आठवले आणि त्याचसोबत काही दिवसांपूर्वी स्वामींनी शिवलिंगावर गोवऱ्या जाळून होम केला होता हे ही त्यांना आठवले. स्वामींच्या या कृतीमागचा अर्थबोध काही केल्या होत नव्हता. गेले काही दिवस स्वामी महाराजांच्या स्वभावातील आक्रमकपणा निवळतो आहे तसेच अधूनमधून दुश्चिन्ह दर्शवणारी वाक्ये स्वामी महाराजांच्या मुखातून निघत आहे याचा अर्थ स्वामी निर्याणकाळ जवळ तर आला नसावा ना? क्षणभर मनात आलेल्या या शंकेनेच बाळप्पा गर्भगळीत झाले. स्वामींच्या ‘असण्याची’ सवय शरीरातील अणुरेणूत अशी काही भिनली गेली होती की त्यामुळेच, त्यांच्या ‘नसण्याची’ कल्पना देखील बाळप्पांना नखशिखांत हादरवून गेली.

तात्या सुभेदारांच्या घरचा प्रसंग. दुपारची वेळ. स्वामी महाराजांना शौचास जाववून आणले. तेव्हा ते बसल्या जागीच लवंडले. हे पाहून सेवेकरी मंडळी घाबऱ्या घुबऱ्या अवस्थेत तिथे गोळा झाली. त्यावर स्वामी म्हणाले, ‘ पटकीने मला ढकलले.’

त्या दिवशीचा बराचसा काळ स्वामी ज्वराच्या अंमलाखाली होते. अंगात अतिशय ताप भरून राहिला होता. सायंकाळी स्वामींना मुरलीधराच्या मंदिरामध्ये नेण्यात आले. तिथंच मुक्काम झाला. प्रकृतीस रेच होऊन थोडा आराम पडला तशी दुसऱ्या दिवशी महाराजांस पालखीत बसवून नागणहळ्ळीस नेण्यात आले. तेथील आमराईत चार दिवसांची विश्रांती झाली. मात्र तिथल्या मुक्कामात स्वामी महाराजांनी अन्न वज्र्य केले. पोटात अन्नाचा कण नव्हता. प्रकृतीस आराम पडत नव्हता. अवस्था बिकट आहे हे ओळखून सखाराम लोखंडे सेवेकऱ्याने स्वामी महाराजांना पुन्हा वटवृक्षाकडे येण्याची प्रार्थना केली. स्वामींनी त्याच्या प्रार्थनेचा स्वीकार केला तसे त्यांना पालखीत घालून पुन्हा अक्कलकोटास आणले गेले. वटवृक्षाच्या सान्निध्यात पुन्हा एकदा स्वामी महाराजांची ‘काया’ स्थिरावली.
असे असले तरी महाराजांचा अन्नत्याग सुरूच होता. अंगात तापाचा जोर वाढत असला तरी चेहऱ्यावर वेदना, कणकण यांचा लवलेशही नव्हता. सर्वकाही सुखनव, आनंदमय, आणि स्वामीमय असले तरी स्वामींच्या मुखातील प्रत्येक शब्द त्यांच्या निर्याणाविषयी सुचीत करीत होता. स्वामींनी त्यांच्या गोपाळ न्हाव्याला बोलावून त्याचेकडून श्मश्रू करवून घेतले. त्यानंतर महाराजांस मंगलस्नान घालून आरती केली गेली, षोडशोपचारविधी करण्यात आले. वातावरणात तात्पुरतं का होईना चैतन्य दाटलेलं असलं तरी इथे 'चैतन्याचा कोंभ’ मात्र उदासलेला होता. चेहऱ्यावरील कोटी सूर्याचं तेज ग्रहणातल्या स्पर्शकाळागत झाकोळलं गेलं होतं. आनंदाचा कंद नैराश्याचा धागा चाळवीत स्वस्थ बसला होता. शरीराचा दाह वाढतच होता. तेजाने आतबाहेर कल्लोळ मांडला होता. वृत्तीची निवृत्ती काय असावी हे दाखविण्याचाच जणू तो प्रयत्न होता.

त्याचवेळी हे वातावरण बदलावं म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठाही केली जात होती. नामांकित वैद्य मंडळी, अंगारे धुपारे घालणारे, जो तो आपापल्या परीने ह्या अवचित येऊ घातलेल्या परिस्थितीला दूर लोटू पहात होता. तेवढय़ात कुणीतरी स्वामी महाराजांना विचारलं की, ‘महाराज, तुम्ही केव्हा उठाल?’ त्यावर महाराज चटकन म्हणाले, ‘डोंगर बोलतील तेव्हा उठेन! पंढरी जळेल तेव्हा उठेन.’ त्यांच्या या उत्तरावरून त्यांच्या मनीचा कल सर्वाच्याच ध्यानात येऊन गेला. तरीही भक्तांची त्यांच्यावर असलेली अपरंपार माया हे सत्य स्वीकारण्यास तयार नव्हती. औषधोपचार, अंगारे धुपारे चालूच होते. इथे महाराज, त्यांना दिलेली औषधे थुंकून टाकू लागले. अन्न पाणी तर त्यागलेलेच होते. आता वृत्तीचाही संक्षेप करू लागले.

काही काळ अशाच अवस्थेत पुढे सरकला. वटवृक्षाच्या बुंध्याला टेकून बसलेल्या स्वामी महाराजांनी सेवेकऱ्यास सूचना केली. आपले म्हणून जे जे काही वस्त्रादी सामान, वस्तू आहेत त्यास विहिरीत टाकून देण्याची त्यांनी आज्ञा केली तसेच आपल्या सभोवती सहवासातील जी काही गायी-वासरे-बैल-घोडी आहेत त्यांना आपल्यापाशी घेऊन येण्यास सांगितले.

चैत्र शुद्ध १३. दुपारची वेळ. महाराजांच्या अतर्क्य सूचनेने भक्तगण बावरून गेले होते. मात्र त्यांनी केलेली सूचना मान्य करणे ओघानेच आले. स्वामींच्या सांगण्यानुसार सर्व जनावरे तिथं आणली गेली. स्वामींनी अतिशय वात्सल्याने त्या सर्वाच्या मुखावरून हात फिरवला. त्या दिवशी त्यांच्या समोर आलेल्या नेवैद्य भोजनाची ताटे त्यांनी या मुक्या प्राण्यांसमोर ठेवली. आपली काही वस्त्रे त्या जनावरांवर पांघरली. सर्वाचे सर्व काही निगुतीने झाल्याची खात्री बाळगून हा पुराणपुरुष पुन्हा एकदा वटवृक्षाखाली येऊन बसला.

थोडा काळ सरला असेल, आणि स्वामींनी श्रीपादभटास सूचना करून वटवृक्षाच्या बुंध्याजवळ तक्क्या आणून ठेवावयास सांगितला. तसे झाल्यावर श्रीपादभटाच्याच मदतीने स्वामी महाराज आसनमांडी घालून त्या तक्क्यास टेकले, वटवृक्षाखाली स्थिर झाले आणि पाहता पाहता निजानंदी मग्न झाले. एकाएकी डोळ्यांच्या पापण्या हलण्याच्या राहिल्या. चेहऱ्यावर प्रसन्नवृत्ती विलसत होती. सात फुटांचा तो अजस्र देह कळिकाळाला अंगावर वागवीत तिथंच स्तब्ध झाला. वातावरणात एकाएकी औदासिन्याची कळा पसरली. दिवसाढवळ्या वटवृक्षावरील वाघळांचा फडफडाट त्या वातावरणाला दुश्चिन्हाचं भान आणता झाला तशी भक्तांनी तारस्वरात हंबरडा फोडला. हुंदक्यांचे अस्फुट कढ गगनभेदी किंकाळ्यांतून प्रसविले आणि त्यातच त्या मुक्या जनावरांचे अर्थपूर्ण विलाप वातावरणास गहिरा अर्थ प्राप्त करून देते झाले. गाय, बैल, कुत्र्यांच्या नजरेतून कारुण्याचे बांध कोसळले आणि त्याचवेळी, त्या वातावरणाला आश्वासकतेचा छेद देण्यासाठीच की काय स्वामी महाराज कळिकाळाच्या क्षणिक झोपेतून पुन्हा एकदा जागे झाले. तिथं जमलेल्या प्रत्येकाकडे निर्मळ आनंदाचा कटाक्ष टाकीत स्वामींनी आपल्या मुखातून अखेरची दिव्यवाणी प्रसविली.

अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जना: पर्युपासते।
तेषा नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्॥

सर्व भक्तांना त्यांच्या योगक्षेमाची पूर्ण काळजी घेणार असल्याचे अभयवचन देत, क्षणभरासाठी परतलेलं ते रसरशीत चैतन्य पुन्हा देहरुपात प्रगट न होण्यासाठीचं वर्तमान प्रगट करोन अंतर्धान पावलं. दु:खाच्या हलकल्लोळात सामावून गेलं. अवघं ‘अक्कलकोट’ असुरक्षिततेच्या लाटेनं गिळंकृत केलं. वातावरणाला नैराश्याची पुटं चढली. सर्वत्र उदासीनतेचा काळोख साचून राहिला. पाण्याचं प्रवाहीपण गोठलं आणि रया गेलेल्या कळाहीन शरीराला धारण करणारी ती भक्तमंडळी जिवंत प्रेतासमान भासू लागली.
सातशे वर्षांचा प्रदीर्घ प्रवास आपल्या विस्तीर्ण भालप्रदेशावर सहजपणे वागविणारा तो ‘बालोन्मत्तपिशाच्च’ वृत्तीचा ‘पुराणपुरुष’ केवळ आठवणींचा ‘धनी’ होऊन राहिला. रागाने थरथरणारा आणि गडगडाटी हास्याने डुचमळणारा तो अवाढव्य देह समाधीमंदिराच्या तळघरातील काळोखात मिसळून गेला. कोटी कोटी सूर्याचे तेज अवतारसमाप्तीच्या मळभाने आच्छदलं गेलं आणि अमांगल्य जाळून टाकणारी स्वामींची भेदक, तीक्ष्ण नजर बंद पापण्यांच्या आत थिजून गेली. ‘श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ’ ह्या मंत्रगजरातून प्रगटलेले ते परब्रह्माचं लसलसतं सौंदर्य काळसर्पाच्या ‘विळख्यात’ हरवून गेलं. हे सर्व काही जरी खरं असलं तरी ते अंतिम सत्य होतं का? स्वामी समर्थ महाराजांचं अनंताच्या प्रवासाला निघून जाणं हे खऱ्या अर्थाने त्यांचं ‘कायमचं’ जाणं होतं का? केवळ शरीराचा त्याग म्हणजे परमेश्वरी तत्त्वाचा लोप होणं एवढाच त्याचा अर्थ होता का?

या आणि अशा अनेक प्रश्नांना कायमचाच पूर्णविराम देण्यासाठी तिथं आणखी एक निमित्त घडलं.

अवचित आलेल्या मळभाचं ग्रहण सोडविण्यासाठी तिथं प्रकाशाचा एक दिव्य तेजस्वी किरण अनाहूतपणे प्रगटला आणि पाहता पाहता त्याच्या साथीदारांनी उजेडाच्या पिवळाधम्मक प्रकाशात तिथे तेजाचा ‘सडा’ शिंपला. कुंद वातावरण थोडंफार सलावलं. दूरवर कुठंतरी चिमण्या चिवचिवू लागल्या. पक्ष्यांनी एकच किलबिलाट मांडला. तेव्हढय़ात, अनावर होऊन भुकेजलेलं एक निरागस वासरू वास्तवाची जाणीव भिरकावून देत मोठय़ांदा हंबरलं. गर्दीच्या त्या कोलाहलातही त्यानं सहजपणे आपल्या मातेला शोधून काढलं आणि मोठय़ा आवेगानं तिची आचळं लुचू लागलं. विझू पाहात असलेल्या नैराश्याला दूर सारणारी चैतन्यमयी सृजनाची ती पहिलीवहिली ओळख तिथं प्रगटली. तशी दूरवर कुठूनशी कस्तुरीचा सुगंध घेऊन आलेली वाऱ्याची अवखळ झुळूक एकाच वेळी प्रत्येकाच्या कानात विलक्षण धिटाईने कुजबुजली -
‘हम गया नही.. जिंदा है।’

लेखक - श्री. विवेक दिगंबर वैद्य

संकलन : श्री स्वामी समर्थ भक्त परिवार समूह 
(FB https://www.fb.com/shreeswamisamarth)
(WhatsApp : 7021942657)

राजाधिराज श्रीस्वामी समर्थ महाराजांशी संबंधित आणखीन दुर्मिळ व अस्सल (Exclusive & Authentic) माहितीसाठी व इतर अध्यात्मिक माहितीपर मेसेजेस वाचण्यासाठी आपल्या श्रीस्वामी समर्थ  भक्त परिवाराचे खालील फेसबुक पेज अवश्य लाईक करावे ,व्हॉटसअॅप लिस्टला जॉईन व्हावे किंवा ब्लॉगला फॉलो करावे. 



तसंच अधिकाधिक लोकांना व ग्रुपमध्ये हा मेसेज फेसबुक, व्हॉटसऍप इ. माध्यमाद्वारे या दोन्ही लिंकसकट व संपूर्ण आवाहनासहित शेअर करावी ही नम्र विनंती.

॥ राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय ॥

आपले नम्र
श्री स्वामी समर्थ भक्त परिवार, फेसबुक समूह
https://www.facebook.com/groups/shreeswamisamarth

Tuesday, June 21, 2016

सामुदायिक नामस्मरण सोहळा (रवि. ३ जुलै २०१६) - बोरीवली (w)

** जाहीर निमंत्रण : सामुदायिक स्वामी नामस्मरण सोहळा **
रविवार दि. ३ जुलै २०१६, सायं. ठीक ४ वाजता
स्थळ : चोगले कुटुंबियांचे विठ्ठल मारुती पंचायतन देवस्थान, श्रीराम मंदिर, श्रीराम मंदिर रोड, बाभई नाका, बोरीवली (पश्चिम) - ९२
संपर्क : प्रथमेश लोके (9821941819)
नाव नोंदणी आवश्यक ! इच्छूकांनी आपले नाव या लिंकवर ऑनलाईन नोंदवावे : https://goo.gl/sr2FYz
कृपया निर्धारित वेळेच्या १५-२० मिनिटे आधीच उपस्थित राहावे, कार्यक्रम स्थळी नाव नोंदणी/नामस्मरण पुस्तिका वाटप ठीक ३:३० वा. पासून सुरु होईल.

[कृपया पूर्ण वाचा व शेअर करा]
श्रीस्वामीकृपेने मुंबई, ठाणे, पुणे, अक्कलकोट येथील नामस्मरण सोहळ्यांना मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर खास स्वामीभक्तांच्या आग्रहास्तव पश्चिम उपनगरामध्ये दीर्घ कालावधीनंतर (साधारण ९ महिन्यानंतर) सामुदायिक नामस्मरण सोहळा आपल्या श्रीस्वामी समर्थ भक्त परिवार फेसबुक समूहाच्या वतीने आयोजित करण्यात येत आहे.  सदर नामस्मरण सोहळा रवि. दि. ३ जुलै २०१६ रोजी सायं. ४ वाजता बोरीवली पश्चिम येथील चोगले राम मंदिर, बाभई नाका येथे आयोजित केला आहे. या श्रीराम मंदिराच्या अगदी समोरच श्रीस्वामींचा मठ आहे व त्या मठातील स्वामीभक्तांच्या मदतीनेच आपण हा सोहळा श्रीराम मंदिरामध्ये आयोजित करत आहोत. तरी सर्व स्वामी भक्तांनी या सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. आजतायत मुंबईमधील पश्चिम उपनगरामध्ये नामस्मरण सोहळा तुलतेने कमी वेळा संपन्न झाला आहे,  आताही  पश्चिम उपनगरात दीर्घ कालावधीनंतर हा नामस्मरण सोहळा संपन्न होत आहे. तेव्हा सर्वांनीच विशेषतः पश्चिम उपनगरातील स्वामीभक्तांनी हा नामस्मरण सोहळ्याकरीता आवर्जून उपस्थित राहावे हि नम्र विनंती.

कलियुगात उपासनेचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग म्हणजे नामस्मरण. वैयक्तित नामस्मरणापेक्षा सामुदायिक नामस्मरण हे अधिक प्रभावी आहे. त्यामुळे मनात सात्विक विचार येतात व सर्व संकटांचा परिहार होऊन आनंद मिळतो. सगळ्यांच्या एकत्रित ताला-सुरात म्हटल्या जाणाऱ्या स्वामींच्या गजराने जी ऊर्जा निर्माण होते, ती आपल्याला खूप काही देऊन जाते. एक वेगळ्याच प्रकारचा अध्यात्मिक आनंद आपल्याला अनुभवता येतो. तरी अशा या सामुदायिक नामस्मरण सोहळ्याला आपल्या सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे.

इच्छूकांनी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. नामस्मरणाला येणाऱ्या भावीकांनी आपले नाव व संपर्क क्रमांक या लिंकवर ऑनलाईन नोंदवावे : https://goo.gl/sr2FYz
काही अडचण आल्यास मात्र वर दिलेल्या नंबरवर SMS किंवा WhatsApp मेसेजद्वारे हि नोंदवता  येईल. (शक्यतो ऑनलाईनच नोंदणी करावी)
कृपया निर्धारित वेळेच्या १५-२० मिनिटे आधीच उपस्थित राहावे, कार्यक्रम स्थळी नाव नोंदणी/पुस्तिका वाटप ठीक ३:३० वा. पासून सुरु होईल.

आपला नम्र,
प्रथमेश लोके (9821941819)
श्री स्वामी समर्थ भक्त परिवार (फेसबुक समुह)

(विशेष नम्र विनंती : स्वामींच्या नामाचा प्रसार ही स्वामीसेवाच आहे हे जाणून आपण या नामस्मरण सोहळ्याच्या निमंत्रणाचा हा मेसेज फेसबुक, व्हॉटसअॅप, हाईकवर आपल्या मित्रपरिवारासोबत तसेच ग्रुप्समध्ये जास्तीत जास्त शेयर करा जेणेकरून अधिकाधिक श्रीस्वामीभक्तांना या नामस्मरण सोहळ्याचा लाभ घेता येईल !)